Blogs Details

ज्ञानदीप लावू जगी

शिक्षण हा माणसाच्या आयुष्यातील एक महत्वाचा भाग आहे. असं म्हणतात की माणूस आयुष्यभर विद्यार्थीच असतो, पण शाळेच्या आणि त्यानंतर कॉलेजच्या चार भिंतींत तो ज्ञानानं आणि अनुभवांनी प्रगल्भ होत जातो

आजच्या तरुण वर्गाशी बोलताना एक गोष्ट प्रकर्षानं जाणवते, ती म्हणजे त्यांचा शिक्षणाकडे बघण्याचा दृष्टीकोन खूप मोकळा आणि प्रगल्भ आहे. चाकोरीबाहेरचा विचार ते करू शकतात. करिअरच्या अनेक संधी उपलब्ध असल्याने आजचा तरुण वर्ग साहजिकच कुठल्या क्षेत्रात जास्त प्रॉस्पेक्ट्स आहेत, याचा नीट विचार करतो. आपली स्वप्नं आपल्या टर्म्सवर पूर्ण करण्याची ताकद असलेल्या तरुणाईच्या स्वप्नांची भरारी फार उंच आहे, फक्त तिला योग्य दिशेचे आणि मार्गदर्शनाचे पंख मिळाले तर त्यातून पुन्हा एकदा जगाला नवे शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ, कलाकार, खेळाडू किंवा डॉक्टर्स मिळू शकतील

शिक्षणाकडे फक्त मार्क्स आणि डिग्रीच्या दृष्टीकोनातून बघता आयुष्य घडवण्याची एक संधी म्हणून पाहायला हवं, यासाठी कार्यरत असणाऱ्या आणि त्यासाठी विद्यार्थ्यांना सर्व प्रकारची माहिती पुरवणाऱ्या वेबसाईट्समध्ये ॲडमिशनप्लेक्सचं नाव अग्रणी घ्यावं लागेल. तरुणांना करिअर गाईडन्स देणं, करिअरच्या नवीन संधींची माहिती देणं, एवढ्यावरच थांबता त्यांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात करिअर करता यावं, यासाठी सर्वतोपरी मदत करणं, या कार्यांमध्ये ॲडमिशनप्लेक्स ही वेबसाईट अग्रेसर आहे. या अभिमानास्पद परंपरेत यंदाच्या स्वातंत्र्यदिनी आणखी एक मानाचं पान समाविष्ट होत आहे. भारताच्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनाच्या निमित्तानं ॲडमिशनप्लेक्सतर्फे एक विशेष योजना जाहीर करण्यात येत आहे, ज्यामध्ये १५ ऑगस्ट या दिवशी ॲडमिशनप्लेक्सच्या सर्व सुविधांसाठी मोफत रजिस्ट्रेशन करता येईल. 14 ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून पुढील 24 तास ही योजना उपलब्ध आहे. या योजनेद्वारे आजपर्यंत ॲडमिशनप्लेक्सचा शिक्षणक्षेत्रातील कार्याचा चालत आलेला ज्ञानदीप जास्तीत जास्त तरुणांपर्यंत पोहोचावा, हीच या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्तानं सदिच्छा....