Our Blogs

ज्ञानदीप लावू जगी

शिक्षण हा माणसाच्या आयुष्यातील एक महत्वाचा भाग आहे. असं म्हणतात की माणूस आयुष्यभर विद्यार्थीच असतो, पण शाळेच्या आणि त्यानंतर कॉलेजच्या चार भिंतींत तो ज्ञानानं आणि अनुभवांनी प्रगल्भ होत जातो

आजच्या तरुण वर्गाशी बोलताना एक गोष्ट प्रकर्षानं जाणवते, ती म्हणजे त्यांचा शिक्षणाकडे बघण्याचा दृष्टीकोन खूप मोकळा आणि प्रगल्भ आहे. चाकोरीबाहेरचा विचार ते करू शकतात. करिअरच्या अनेक संधी उपलब्ध असल्याने आजचा तरुण वर्ग साहजिकच कुठल्या क्षेत्रात जास्त प्रॉस्पेक्ट्स आहेत, याचा नीट विचार करतो. आपली स्वप्नं आपल्या टर्म्सवर पूर्ण करण्याची ताकद असलेल्या तरुणाईच्या स्वप्नांची भरारी फार उंच आहे, फक्त तिला योग्य दिशेचे आणि मार्गदर्शनाचे पंख मिळाले तर त्यातून पुन्हा एकदा जगाला नवे शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ, कलाकार, खेळाडू किंवा डॉक्टर्स मिळू शकतील

शिक्षणाकडे फक्त मार्क्स आणि डिग्रीच्या दृष्टीकोनातून बघता आयुष्य घडवण्याची एक संधी म्हणून पाहायला हवं, यासाठी कार्यरत असणाऱ्या आणि त्यासाठी विद्यार्थ्यांना सर्व प्रकारची माहिती पुरवणाऱ्या वेबसाईट्समध्ये ॲडमिशनप्लेक्सचं नाव अग्रणी घ्यावं लागेल. तरुणांना करिअर गाईडन्स देणं, करिअरच्या नवीन संधींची माहिती देणं, एवढ्यावरच थांबता त्यांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात करिअर करता यावं, यासाठी सर्वतोपरी मदत करणं, या कार्यांमध्ये ॲडमिशनप्लेक्स ही वेबसाईट अग्रेसर आहे. या अभिमानास्पद परंपरेत यंदाच्या स्वातंत्र्यदिनी आणखी एक मानाचं पान समाविष्ट होत आहे. भारताच्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनाच्या निमित्तानं ॲडमिशनप्लेक्सतर्फे एक विशेष योजना जाहीर करण्यात येत आहे, ज्यामध्ये १५ ऑगस्ट या दिवशी ॲडमिशनप्लेक्सच्या सर्व सुविधांसाठी मोफत रजिस्ट्रेशन करता येईल. 14 ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून पुढील 24 तास ही योजना उपलब्ध आहे. या योजनेद्वारे आजपर्यंत ॲडमिशनप्लेक्सचा शिक्षणक्षेत्रातील कार्याचा चालत आलेला ज्ञानदीप जास्तीत जास्त तरुणांपर्यंत पोहोचावा, हीच या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्तानं सदिच्छा....

Read More

मार्कशीटवर न मावणारी.... पिशवीभर स्वप्नं....

जून हा वर्षातला फार विशेष महिना आहे. उन्हाच्या तडाख्यानंतरचा पहिला पाऊस आणि उन्हाळी सुट्टीनंतरची शाळा कॉलेजची लगबग यांच्या गडबडीत जूनचा पहिला पंधरवडा कसा निघून जातो, समजतही नाही हो.... आत्ताची गोष्ट वेगळी, पण फार लांब कशाला जायचं, अगदी वीस एक वर्षांपूर्वीचा एखादा जून महिना आठवून बघा.... कोसळणारा पाऊस, एखाद्या प्लास्टिकच्या पिशवीत ठेवलेलं मोठ्ठं एन्व्हलप, त्यातली जीवापाड अभ्यास करून मिळवलेली आपली सर्टिफिकेट्स, एका हातानं छत्री आणि दुसऱ्या हातानं ती पिशवी सावरत गर्दीतून कॉलेजकडे निघालेली पावलं..... डोळ्यांत नव्या आयुष्याची नवी स्वप्नं, आठवलं का?

रिझल्ट लागल्यावर आपसूकच धावपळ सुरु व्हायची ती बेस्ट कॉलेजमध्ये प्रवेश मिळवण्याची.... कॉलेजेसच्या गेट्सवर फॉर्मसाठी भर पावसातही लाईन लागलेली असायची. प्रत्येकाच्या नजरेत काहीशी धाकधूक आणि बरीचशी उत्सुकता दिसायची. कॉलेजचा कट ऑफ किती मार्कांचा आहे, त्यात आपण किती पुढं किंवा मागे आहोत, आपलं नाव पहिल्या लिस्टमध्ये असेल की दुसऱ्या की तिसऱ्या, असे असंख्य प्रश्न डोक्यात भिरभिरत असायचे. हे सगळे प्रश्न डोक्यात वागवत त्या लाईनमध्ये उभं राहायचं. त्याबरोबरच घरी पालकांशी चर्चा व्हायच्या. त्यांचा सल्ला अर्थातच विचारता घेतला जायचा. एकदा फॉर्म्स भरून झाले की वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये जाऊन लिस्ट चेक करण्याचं काम असायचं. लिस्ट लागल्याचं कळताच हातातली सगळी कामं टाकून, ऊन, पाऊस, वारा, कसलीही पर्वा न करता कॉलेजकडे धाव घेतली जायची. आजही ते दिवस आठवले की छान वाटतं. खूप काही शिकवलं त्या दिवसांनी.....

हेच सगळं करत तेव्हाच्या पिढीनं आपलं शिक्षण पूर्ण केलं. काळ बदलला. करियरच्या नवनवीन संधी उपलब्ध झाल्या. डॉक्टर, इंजिनिअर किंवा गेला बाजार काँप्युटर यापलिकडे जाऊनही अनेक नवीन कोर्सेस विद्यार्थ्यांसाठी खुले झाले. फक्त डिग्री नाही तर डिप्लोमापासून प्रायव्हेट युनिव्हार्सिटीजपर्यंत शिक्षणक्षेत्र विस्तारत गेलं आणि अर्थातच, वर सांगितलेली सगळी प्रोसेस आता हळूहळू मागे पडू लागली आहे.

ॲडमिशनप्लेक्स हे याच बदलत्या रूपाचं एक प्रतिक आहे. आता ते पाऊसपाण्याचं सर्टिफिकेट्स सांभाळत फिरणं आणि ते कॉलेजेसच्या वाऱ्या करणं मागे पडलंय. त्या सर्टिफिकेट्सचं मोल आम्ही जाणतो आणि म्हणूनच आत्ताच्या ओंनलाईनच्या काळात ते मोल टिकून राहाणं आम्हाला महत्वाचं वाटतं. पण मग ॲडमिशनचं काय? कशाला काळजी करताय, आम्ही आहोत ना....

ॲडमिशनप्लेक्समध्ये तुम्हाला हर तऱ्हेच्या कोर्सेसची माहिती मिळेल आणि फक्त माहिती नाही तर तुमच्या ॲडमिशनची प्रक्रिया अत्यंत सुलभ आणि लेटेस्ट पद्धतीनं पार पाडण्यासाठी आम्ही कायम तयार आहोत. त्याचप्रमाणे करियर गाईडन्स, तुमच्या आवडीनुसार आणि तुमच्या स्किलसेटनुसार तुम्हाला योग्य त्या ठिकाणी ॲडमिशन मिळण्यात मदत करणं, हेही आम्ही तुमच्यासाठी करतो. कारण आम्ही शिक्षणाचं मूल्य जाणतो. ॲडमिशनप्लेक्स आपल्या सेवेसाठी सदैव तत्पर आहोत.

Read More

मोठेपणी कोण होणार????

मोठेपणी कोण होणार???? एक काळ होता, जेव्हा मुलांची दहावी बारावी झाली की कुठल्या स्ट्रीम ला ॲडमिशन घ्यायची?’ या प्रश्नाचं उत्तर दोनच पर्यायांमध्ये विभागलेलं होतं. डॉक्टर किंवा इंजिनिअर..... काळ बदलला तशी अनेक नवनवीन शाखांचे दरवाजे विद्यार्थ्यांसाठी खुले होत गेले. अर्थातच, प्रत्येकाला ‘वेगळं’ काहीतरी करायची ओढ वाटू लागली आणि त्यातलं वेगळेपण हळूहळू लोप पावत गेलं. इतकं की आता वेगवेगळ्या शाखांमध्येच प्रचंड स्पर्धा निमाण झाली. सध्याच्या या तीव्र स्पर्धेच्या काळात विद्यार्थी आणि पालक दोघांनाही सतावणारा महत्वाचा प्रश्न म्हणजे दहावी-बारावीनंतर कोणता करिअर ऑप्शन निवडावा? दिवसेंदिवस हा प्रश्न आणखी बिकट होत चाललेला आहे. शैक्षणिक संस्थांची आणि त्यांत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची वाढती संख्या, माहितीच्या महाजालाचा झालेला विस्फोट, संधींची विपुल उपलब्धता, वाढत्या अपेक्षा आणि अर्थातच उंचावलेलं राहणीमान अशी अनेक कारणं या प्रश्नाच्या मुळाशी आहेत. पण आता कारणांकडे जाण्यापेक्षा उत्तराकडे जाणं जास्त महत्वाचं आहे आणि हो, तुमच्या या प्रश्नाचं उत्तर मिळण्यासाठी तुम्हाला एकदातरी ॲडमिशनप्लेक्सला भेट द्यावीच लागेल. पण नेमकं आहे तरी काय हे ॲडमिशनप्लेक्स?? आणि करिअरची निवड म्हणजे पुढच्या आयुष्याचं महाद्वारच.... इतका मोठा निर्णय असा, एका छताखाली बसून फायनल होईल? तुमच्या या सगळ्या शंका रास्त आहेत आणि म्हणूनच ॲडमिशनप्लेक्सबद्दल तुम्हाला थोडी माहिती घेणं गरजेचं आहे. काय आहे ॲडमिशनप्लेक्स? ॲडमिशनप्लेक्स ही तुमच्या भावी व्यावसायिक जीवनाची गुरुकिल्ली आहे, तुमच्या अंगभूत गुणांना करिअरची वाट दाखवणारा गाईड आहे आणि आजच्या भाषेत सांगायचं तर तुमच्या उत्तुंग व्यावसायिक यशाचा पासवर्ड आहे. मुळात, ॲडमिशनप्लेक्स तुम्हाला तुमच्या करिअर निवडीत मोलाची मदत करेल. हो, अगदी तुमच्या पात्रतेनुसार कॉलेज कुठलं तुम्ही निवडू शकता, कुठल्या कोर्सला ॲडमिशन घ्यायची इथपासून ते तुमच्यासाठी उपलब्ध असलेल्या नानाविध स्कॉलरशिप्सपर्यंत प्रत्येक टप्प्यावर आणि प्रत्येक बाबतीत ॲडमिशनप्लेक्स तुम्हाला अत्यंत मोलाची माहिती उपलब्ध करून देईल. कॉलेजमध्ये ॲडमिशन घेताना समोर आलेले अनेक पर्याय बघून आपण गोंधळून जातो. अशा वेळी ॲडमिशनप्लेक्स तुम्हाला तुमच्या सुयोग्य पर्याय निवडण्यात मदत करेल. जी गोष्ट कॉलेजची, तीच कोर्सेसची..... सीईटीच्या परीक्षेसाठी तुमच्यासमोर भरमसाठ विषयांचे पर्याय उपलब्ध असतात. त्यातले नेमके कुठले विषय निवडावेत, यासाठीही ॲडमिशनप्लेक्स तुम्हाला साहाय्य करेल. ॲडमिशनप्लेक्स प्रोसेसमध्ये कोणकोणती कागदपत्रं लागतात, ती कधी, कुठं, कशी सबमिट करायची असतात, याचीही सांगोपांग माहिती तुम्हाला ॲडमिशनप्लेक्स मध्ये मिळेल. त्याचप्रमाणे तुमच्या करिअरसाठी अत्यंत गरजेचं असं तुमचं युनिक प्रोफाईल तयार करण्यात ॲडमिशनप्लेक्स तुम्हाला सर्वोपरी मदत करेल. करिअर निवडणं हा आयुष्यातला अत्यंत नाजूक टप्पा असतो. त्या एका निर्णयावर आपलं संपूर्ण आयुष्य अवलंबून असतं. अर्थातच, इतका मोठा निर्णय घेताना भीती वाटणं, गोंधळ उडणं, टेन्शन येणं स्वाभाविकच आहे. पण तीच खरी वेळ असते एखाद्या तज्ञ सल्लागाराकडून योग्य मार्गदर्शन घेण्याची!! तुमची हीच गरज ओळखून ॲडमिशनप्लेक्स तुमच्यासाठी सदैव तत्पर आहे. कारण, शेवटी स्वप्नं सत्यात उतरली की आयुष्याचा डायग्राम परफेक्ट जमतो आणि तुमच्या स्वप्नांचा परफेक्ट जमलेला डायग्राम म्हणजे ॲडमिशनप्लेक्स.... आजच भेट द्या आणि ॲडमिशनप्लेक्स साथीनं आपल्या करिअरचा राजमार्ग निश्चित करा.
Read More